CMPसीएमपी प्रणालीत येणाऱ्या अडचणी संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
  

अडचणी
करावयाची कार्यवाही तथा पत्रव्यवहार

1

बीम्स प्रणालीत पेयी रजिस्ट्रेशन करीत असतांना आयएफएस कोड या टॅबमध्ये क्लिक केल्यावर बँक-ब्रांच चा तपशील दिसत नाही.

जिल्हा कोषागार कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात यावा. सोबत बॅक-ब्रांच ची खातरजमा करणेसाठी रदद धनादेश अथवा खातेपुस्तकाची साक्षांकित प्रत जोडावी.


2

जिल्हयातील इतर कार्यालयाने रजिस्ट्रेशन केलेल्या व्हेंडरचे सीएमपी प्रदानाची बीडीएस तयार करणे.

जिल्हा कोषागाराच्या ब्लॉगवर रजिस्टर्ड झालेल्या सर्व व्हेंडरचे पेयी कोड उपलब्ध आहेत.  त्यातून रजिस्टर्ड पेयी कोड प्राप्त करुन घ्यावा.
बीम्स प्रणालीत बीडीएस काढीत असतांना देयकासंबंधीची सर्व माहिती भरल्यानंतर रजिस्टर्ड पेयी वर क्लिक केले असता other payee असा ऑप्शन दिसून येतो.  सदर ऑप्शनवर क्लिक केले असता येणाऱ्या रिकामी फिल्डमध्ये  प्राप्त पेयी कोड टाईप करुन टॅब बटन दाबावे.  व्हेंडर अकाऊंट / आयएफएस कोड . माहिती दिसून येईल. अदा करावयाची  रक्कम भरुन सबमीट करावे.

3

सीएमपी एसबीआय पोर्टलवर देयके ऑथोराईझ करुनही संबंधीत त्रयस्थ अदात्याच्या खाती रक्कम जमा झाली नाही.

सीएमपी अंधेरी ब्रांच यांचेकडील नमूद -मेल आयडीवर  खालील नमून्यामध्ये अदात्याविषयीची सर्व माहिती भरुन पाठविणे.              नमूना
itro@sbi.co.in
debjyoti.dutta@sbi.co.in
4

सीएमपी पोर्टलवरील लॉगीनचा पासवर्ड गहाळ झाला.

सीएमपी पोर्टलवरील लॉगीन पासवर्ड आपण विसरला असाल अथवा गहाळ झाल्यास याबाबत‍ कोषागारास पत्राने अवगत करावे व व्यक्तीश: संपर्क साधावा.
5

कार्यालयात अधिकारी/कर्मचारी बदलीने हजर झाल्यास पेयी रजिस्ट्रेशन करीता माहिती उपलब्ध नाही.

आपल्या कार्यालयात अन्य जिल्हयातून अथवा तालुक्यातून बदलीने अधिकारी/कर्मचारी हजर झाले असतील तर अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांची नांवे आपले बीम्स लॉगीनमध्ये रजिस्टर्ड पेयी तपशीलात दिसून येत नाहीत.  यासाठी त्यांची नांवे आपले लॉगीनमध्ये समाविष्ट करणेसाठी कोषागारास पत्राने कळविण्यात यावे.