CMP


आहरण संवितरण अधिकाऱ्यांना सीएमपी प्रणाली कामकाज करीत असतांना येणाऱ्या अडचणींबाबत कोषागारात वारंवार विचारणा होत असते. अशा बहुतांशी वेळा विचारणा केलेल्या अडचणी संकलित करुन त्यांचेबाबत करावयाची कार्यवाही/कार्यपध्दती खालीलप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे.


1
बीम्स प्रणालीत पेयी रजिस्ट्रेशन करावयाची कार्यपध्दती

2
सीएमपीमार्फत प्रदानासाठी पेयी रजिस्ट्रेशन करणे
बीम्स प्रणालीत final लॉगीनमध्ये   maintenance मेनू मधील add payee praposal या पर्यायातून DDO Vendor, Employee यांची अचूक माहिती भरुन payee application नमूना कोषागारात verify करणेसाठी रदद धनादेशासहीत पाठविण्यात यावा. त्यानंतर कोषागारामार्फत verification झालेनंतर प्राधिकारपत्र तयार करणेसाठी registered payee तपशीलात अदात्यांची नांवे दिसून येतील.
 2
पेयी रजिस्ट्रेशन करतांना bank branch तपशील दिसून येत नाही.
पेयी रजिस्ट्रेशन करीत असतांना बँक ब्रांच तपशील दिसून येत नसल्यास, कोषागारास पत्राने कळविण्यात यावे.  सोबत बँक तपशीलाची स्कॅनप्रत (रदद धनादेश, पासबुकाची छायाप्रत) जोडण्यात यावी. कोषागारामार्फत पुढील कार्यवाही करणेत येईल.
3
पेयी रजिस्ट्रेशन करतांना पॅन क्रमांक आवश्यक.
पेयी रजिस्ट्रेशन करीत असतां पॅन क्रमांक आवश्यक असून कोषागारातून असे रजिस्ट्रेशन verify करता येत नाही
4
सीएमपी पोर्टलवरील पासवर्ड गहाळ झाला असल्यास
याबाबत आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी संबंधीत कोषागार / उपकोषागारास पत्राने कळविण्यात यावे.  त्यांचेमार्फत पुढील कार्यवाही करणेत येवून आपला पासवर्ड त्यांचेमार्फत reset करुन घ्यावा.
5
बदलीने हजर झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पेयी तपशील बीम्स प्रणालीत दिसून येत नसल्यास
बदलीने हजर झालेल्या अधिकारी-कर्मचारी यांचे पूर्वीच्या कार्यालयात पेयी रजिस्ट्रेशन करण्यात आले किंवा कसे ? याबाबत खातरजमा करण्यात यावी. पूर्वीच्या कार्यालयातून अदाता नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.  अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तपशील आपले बीम्स लॉगीनमध्ये वर्ग करणेसाठी कोषागारास उपकोषागारांस पत्राने कळविण्यात यावे.  सोबत  अदाता नोंदणी प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
6
पेयी तपशील delet करुन मिळणेबाबत
पेयी रजिस्ट्रेशन झालेनंतर असा तपशील delet होत नाही. यात बँक ब्रांच ची माहितीत बदल करता येते. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची आपले कार्यालयातून बदली झाल्यास त्यांचा तपशील नवीन कार्यालयात वर्ग होणेसाठी, त्या कार्यालयाने त्यांचेकडील कोषागार उपकोषागारास पत्राने कळवावे.
7
त्रयस्थ अदात्यांचे खाती सीएमपी मार्फत रक्कम जमा झाली नाही
ü  त्रयस्थ अदात्यांचा बीम्स प्रणालीत खाते तपशील योग्य असल्याचा खातेपुस्तकाची तपासणी करुन रक्कम जमा झाली अगर कसे याबाबत खात्री करण्यात यावी.
ü सीएमपीमार्फत कोषागार / उपकोषागारात डिमांड ड्राफट पाठविण्यात आला आहे का याची खात्री करावी.
ü याबाबत खालीलप्रमाणे नमूद संपर्क क्रमांकावर विचारणा करण्यात यावी.
सीएमपी हैद्राबाद  - 

8
सीएमपी पोर्टलवरुन SCROLL डाऊनलोड करणे
सीएमपी पोर्टलवरील लॉगीनमध्ये scroll data availability या पर्यायावर क्लिक केले असता reference ID तयार झाल्याचे दिसून येईल.  त्यांनतर download requested scroll data यामध्ये reference ID नोंदवून स्क्रोल डाऊनलोड करावा.
9
अन्य डिडिओंनी केलेल्या त्रयस्थ अदात्यांच्या नावे प्रदानाची बीडीएस कशी काढावी


अन्य डिडिओंनी केलेल्या त्रयस्थ अदात्याचे नव्याने पेयी रजिस्ट्रेशन होत नाही.  अशा अदात्यांच्या नावे प्रदानाची बीडीएस काढावयाची असल्यास त्यांचा पेयी क्रमांक आवश्यक आहे. बीम्स प्रणालीत registered payee या पर्यायातून other payee मध्ये त्यांचा पेयी क्रमांक नोंदविण्यात यावा. त्यांनतर tab या बटण दाबल्यानंतर अदात्याच्या बँक ब्रांच तपशील दिसून येईल.
10