माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 (1) (ख) 1 ते 17 मुद्दे, जानेवारी 2025
रत्नागिरी कोषागाराच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
जिल्हा कोषागार कार्यालय, रत्नागिरी
मध्यवर्ती इमारत, तळमजला, रत्नागिरी 415612.
दूरध्वनी क्रमांक 02352-222334, 225513
Email id- toadmin-ratnagiri@mah.gov.in to.ratnagiri@zillamahakosh.in
---------------------------------------------------------------------------
जुन्या मुंबई राज्यातील कोषागारे महसूल विभागाकडून वित्त विभागाने दिनांक 01 एप्रिल 1955 पासून आपल्या नियंत्रणाखाली आणली. त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली विदर्भातील कोषागारे वित्त विभागाने दिनांक
01 जानेवारी 1958 पासून आपल्या नियंत्रणाखाली आणली. महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाच्या नियंत्रणाखाली 1 फेब्रुवारी 1962 पासून लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना केली आणि कोषागाराचे तात्काळ नियंत्रण संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य,
मुंबई यांचेकडे विभागप्रमुख या नात्याने सोपविण्यात आले. कोषागाराप्रमाणेच तहसिल स्तरावरील 24 उपकोषागारांचा एक गट दिनांक 1 एप्रिल
1964 रोजी आणि दिनांक 1 जून 1968 रोजी
98 उपकोषागारांचा आणखी एक गट वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात आला. आता राज्यातील सर्व कोषागारे/उपकोषागारे वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असून संचालक लेखा व कोषागारे,
महाराष्ट्र राज्य,
मुंबई या विभागप्रमुखांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत.
रत्नागिरी जिल्हयाकरीता रत्नागिरी येथे 1 जिल्हा कोषागार कार्यालय आणि जिल्हायातील 8तालुकास्थित प्रत्येक तालुक्यासाठी 1 मिळून 8
उपकोषागार कार्यालये कार्यान्वयीत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमूख प्रशासन या धोरणास अनुसरुन कोषागार/उपकोषागार अंतर्गत वित्त विषयक माहिती व कार्यान्वयीत असलेले कामकाज हे या ब्लॉगद्वारे सर्व नागरीकांस अवलोकीत करण्यास आम्हांस आनंद होत आहे.
धन्यवाद....
Subscribe to:
Posts (Atom)