सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सुचना
विषय : प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रे कोषागारात सादर करणेबाबत
संदर्भ : 1. शासन
परिपत्रक क्रमांक मुंविनि-1016/प्र.क्र.06/16/विनियम दिनांक 03/03/2016
2. शासन परिपत्रक क्रमांक अर्थसं-2017/प्र.क्र.94/अर्थ-3
दिनांक 30/06/2017 मधील
परिच्छेद 4.1 (अ)सहायक अनुदाने (वेतनेतर)
संदर्भांकित
शासन परिपत्रकांन्वये अनुदानाची देयके मंजूर झाल्यापासून 1 वर्षाच्या आंत विहीत नमुन्यात
उपयोगिता प्रमाणपत्रे मा. महालेखापालांकडे सादर करणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही बहुतांशी
कार्यालयांनी त्यांचेकडील सहाय्यक अनुदान रक्कमांची उपयोगिता प्रमाणपत्रे मा. महालेखापालांकडे
सादर केलेली नाहीत.
मा. महालेखापाल
यांचेकडे प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रांची यादी सोबत कळविण्यात येत आहे. आपणांकडून प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रे मा. महालेखापालांकडे
सादर करण्यात यावीत. तसेच सदर उपयोगिता प्रमाणपत्रे 2 प्रतीत कोषागाराकडे तात्काळ सादर
करण्यात यावीत.
सदर प्रमाणपत्रे
मा. महालेखापालांकडे सादर न केल्यास या आर्थिक वर्षात संबंधीत लेखाशिर्षाखालील कोणतेही
सहाय्यक अनुदान रक्कमांची देयके शासन परिपत्रकामधील सुचनांनुसार कोषागारात पारीत करता
येणार नाहीत. आपलेकडील संबंधीत लेखाशिर्षाखालील सहाय्यक अनुदाने या वित्तीय वर्षात
अखर्चित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील. याबाबत आपले स्तरावर योग्य ती गंभीर दखल घेण्यात
यावी.
JANUARY 2023
![]() |
![]() |